राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैठण येथे नगरपरिषेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात ज्याला दक्षिण काशी म्हणतो अशा नाथ महाराजांच्या पैठण पासून झाली. याचा मला अतिशय आनंद आहे. आज एकादशीचा दिवस आहे. त्यामुळे आणि अतिशय समृद्ध अशा आमच्या वारकरी परंपरेचा या ठिकाणी या परंपरेला अभिवादन करतो. शहराचा इतिहासात कितीही मागे गेलं तरी देखील पैठणचा उल्लेख आपल्याला सातवाहन काळापासून पाहायला मिळतो. पण आता आपल्याला इतिहासात जायचं नाहीये जो गौरव या पैठणचा इतिहासामध्ये होता. तो गौरव या पैठणला भविष्यातही आपल्याला प्राप्त करून द्यायचा आहे. 
 
आणि म्हणून मी तुमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिला. आणि या संविधानातून आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला. आज देशामध्ये टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं, आणि आपल्याला देखील एकाच मताचा अधिकार आहे, अशा प्रकारची एक समता या लोकशाहीच्या माध्यमातून आणली, आणि या संविधानाने आपल्यावर जबाबदारी टाकली लोकसभेच्या माध्यमातून देशाचा प्रधानमंत्री करतो, 

विधानसभेच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री करतो. आपण मतदान करतो आणि त्याचवेळी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे असे त्यांनी सांगितले. घरकुलासाठी लाभार्थ्यांना जमीन नावावर करून देण्यात येईल, यासाठी आपण भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी माजी मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे भागवत कराड सुरज लोळगे यांची भाषणे झाली. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार भाऊ थोरात, आमदार अनुराधा चव्हाण, मोहिनी सुरज लोळगे, तुषार पाटील, लक्ष्मण आवटे, लक्ष्मण औटे, योगेश गव्हाणे, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या सभेत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होती.